भारता बाहेर डाटा पाठविण्याची क्षमता वाढविण्यावर देणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची सर्वात मोठी 4 जी आणि मोबाईल ब्रॉडब्रँड कंपनी रिलायन्स जिओ, आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम बनविण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ पुढील आवृत्तीमध्ये दोन सबमरीन केबलचा वापर करणार आहे. यासाठी कंपनीने भारत आणि पूर्ण भारतीय रिजनची माहिती लक्षात घेत यांची रचना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यांच्याकरीता जिओने जगातील प्रमुख भागीदार आणि सबमरीन केबल पुरवठादार सबकॉम यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.
भारत-आशिया-एक्सप्रेस (आयएएक्स) सिस्टम भारताच्या पूर्व भाग आणि सिंगापूर तसेच त्याला कनेक्ट करणार आहे. तसेच भारत-युरोप-एक्सप्रेस (आयइएक्स) सिस्टम भारताच्या पश्चिम व मध्य पूर्व युरोपशी जोडणार आहे. यातून आयएएक्स आणि आयइएक्स भारतामध्ये आणि भारताबाहेर डाटा तसेच क्लाउड सेवा पोहचविण्याची क्षमता वाढविणार आहे.
200टीबीपीएसचा स्पीड
2016 मध्ये जिओचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर भारतामध्ये डाटा मागणीत असाधारणपणे तेजी आली आहे. डाटा विक्रीमध्ये आलेल्या या तेजीमुळे भारत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर डाटा नेटवर्कमध्ये गतीमान होत आहे. या नवीन यंत्रणेमुळे सर्वाधिक स्पीड सिस्टम जवळपास 16,000 किलोमीटर दुसरीकडे 200 टीबीपीएसपेक्षा अधिकची क्षमता प्रदान करणार आहे.
अनेक देशांसोबत कनेक्टिव्हिटी
आयएएक्स केबल सिस्टम जगातील सर्वाधिक तेजीने वाढणाऱया अर्थव्यवस्थेत भारताला आशिया प्रशांत बाजारासोबत जोडणार आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आयइएक्स प्रणालीत भारताला युरोपमध्ये इटली मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेपर्यंत जोडण्यात येणार आहे.









