सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळ जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते यांचे जिल्हा परिषद फंडातून सांगरूळ मध्ये वीस लाखाचा निधी मंजूर केला आहे. सांगरूळ येथील चर्मकार समाज, बिरोबा माळ, बिरोबा माळाकडे जाणा-या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून वीस लाखाचा निधी मंजूर केला असून या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे होते.
यावेळी बोलताना जि प सदस्य सुभाष सातपुते यांनी आमचे नेते आमदार पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून सांगरूळ गावाला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आमदार पी एन पाटील यांच्या या माध्यमातून सांगलीमध्ये व परिसरात अनेक दर्जेदार विकासकामे झाली असल्याचे सांगून भविष्यातही आमदार पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला .यानंतर जिल्हा परिषदेचा राजश्री शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल जि.प सदस्य सुभाष सातपुते,विरशैव बॅंकेच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल अनिल सोलापूरे कुंभी कासारी सह साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी निवड झालेबद्दल निवास वातकर यांचा श्री पांडुरंग सेवा सोसायटी व मा .धो. खाडे हरहर महादेव दूध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सदाशिव खाडे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष कृष्णात खाडे पं स . सदस्या अर्चना खाडे उपसरपंच सुशांत नाळे माजी सरपंच आनंदराव नाळे ,यशवंत बँकेचे माजी व्हा चेअरमन दिलीप खाडे , माजी सरपंच शशिकांत म्हेत्तर यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्र संचालन सेवा संस्थेचे संचालकआनंदराव नाळे यांनी केले..प्रास्ताविक दतात्रय बोळावे यांनी तर आभार बाळासो खाडे यांनी मानले.
Previous Articleमोबाईल चोरणाऱ्या जोडगोळीला अटक
Next Article बेळगाव जिह्यात शुक्रवारी 76 जणांना कोरोनाची बाधा









