प्रतिनिधी / बेळगाव
देशाचा भूमिपूत्र, रखरखत्या उन्हात आणि धो धो पावसात राबणारा देशाच्या आर्थिक कण्याचा आधार असणारा शेतकरी स्वत: दयनीय अवस्थेत जगतो, असे विचार जायंट्स फेडरेशनच्या संचालिका ज्योती अनगोळकर यांनी मांडले.
शेतकरी दिनानिमित्त जायंट्स सखीच्यावतीने ग्रामीण भागातील शेतकरी महिलांचा साडी चोळी, भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी अनगोळकर बोलत होत्या.
भारतात शेती व्यवसायात कार्यरत असणाऱया एकूण मनुष्यबळापैकी 70 टक्के महिला आहेत मग असे असताना त्यांची शेतकरी म्हणून कुठेही दखल घेतली जात नाही. जायंट्स सखीने हाच विचार करून भल्या पहाटे उठून स्वयंपाक घरातील कामे, धुणीभांडी करून व इतर मजुरांना घेऊन शेतावर जाणारी किंवा स्वत:ची शेती नसेल तर इतरांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामास जाणाऱया महिलांचा सन्मान येथे होत आहे, असेही त्या म्हणाल्या. व्यासपीठावर अध्यक्षा निता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, खजिनदार लता कंग्राळकर उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक सचिव शितल पाटील यांनी केले. लक्ष्मी महादेव पाटील, लता बाळू सावळे, विमल संभाजी कदम, वंदना इराप्पा पावशे, पार्वती शंकर सायनाक, इंदूबाई शिंदे, सरोजिनी सांबरेकर या महिला शेतकऱयांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अध्यक्षा निता पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱयांना शुभेच्छा देताना संपूर्ण जग कोरोनामुळे थांबले असताना जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी मात्र शेतीच्या कामात मग्न होता, असे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास उपाध्यक्षा विद्या सरनोबत, संचालिका सुलक्षणा शिन्नोळकर, ज्योती पवार, अनुपमा कोकणे, ज्योती सांगुकर उपस्थित होत्या.









