ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जामिया मिलियात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 70 संशयित आरोपींचे छायाचित्र सादर केली आहेत. डिसेंबर महिन्यात सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. याआधी दिल्ली पोलिसांनी काही जणांना तोडफोड, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी काहीजणांना अटक केली होती.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, न्यू पेंड्स कॉलेनी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एसआयटीकडून हिंसाचार प्रकरणी तपास सुरू आहे.
सादर करण्यात आलेल्या छायाचित्रातील 70 जणांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच या आरोपींची माहिती देणाऱयांना दिल्ली पोलिसांकडून बक्षीस देखील दिले जाणार आहे.