प्रतिनिधी / कसबा बीड
कोरोनाव्हायरस लॉक डाऊन काळात सगळीकडे व्यवहार ठप्प झाले आहेत पण भारत देश आपला कृषिप्रधान असल्याने शेतीची कामे थांबवणे चुकीचे आहे. पण काही ठिकाणी जादा दराने रासायनिक खते विकणारी प्रवृत्ती रोखणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेत रासायनिक खतांचा पुरवठा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे यांनी दिला आहे.
शेतीला रासायनिक खतांची टंचाई भासू लागल्याने उत्पादन वाढीवर परिणाम जाणवत आहे . रासायनिक खतांच्या होणा-या काळाबाजारावर शासनाने कठोर पावले उचलावीत . जादा दराने खतांची होणाऱ्या विक्री रोखणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शेतीला खतपुरवठा होणे गरजेचे आहे. शेतीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमती मध्ये केद्र शासनाने सुट द्यावी व हंगामापूर्वी रासायनिक खतांचा पुरवठा त्वरीत करावा अशी मागणीही गावडे यांनी केली.