समतेचे मूल्य रुजणे महत्त्वाचे
आज महिला सर्वच क्षेत्रात चमकताहेत : राजकारणातील महिलांचा सहभाग वाढण्याची गरज
मनीषा सुभेदार, बेळगाव
‘उद्याच्या शाश्वत विकासासाठी लिंग समानता ः आजची गरज’, ‘पूर्व ग्रहाच्या भिंती तोडा’, ‘नेतृत्व आणि महिला’ अशी विविध घोषवाक्मये यंदाच्या महिला दिनासाठी जाहीर झाली आहेत. घोषवाक्मय काही असो समतेचे मूल्य रुजणे महत्त्वाचे आहे. लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन महिला सर्वच क्षेत्रात चमकत आहेत. मात्र राजकारणातील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. राजकारणाशी आपला संबंध नाही, असे मानणाऱया महिलांनी ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हे लक्षात घ्यायला हवे. याच अनुषंगाने राजकारणात सक्रिय असणाऱया महिला काय सांगत आहेत, हे सुद्धा आजच्या दिनाच्या निमित्ताने पहायला हवे…..
समाजाभिमुख विकासाचे ध्येय : शशिकला जोल्ले

राजकारणात धडाडीने काम करत शशिकला जोल्ले यांनी आपला ठसा उमटविला आहे. सहकार, राजकारण, समाजकारण, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटविली आहे. मंत्रिपद सांभाळतानाच कुटुंबाची घडी कुशलतेने सांभाळणाऱया शशिकला जोल्ले कार्यकर्त्यांकडेही तितकेच लक्ष देतात.
पुरुषप्रधान व्यवस्थेत महिलांना स्थान नाही, असे म्हटले जाते. त्यातही राजकारणासारखा प्रांत महिलांसाठी फारसा सुखावह नाही. अशीच धारणा आहे. परंतु जिल्हय़ातील आमदार, खासदार आणि मंत्री अशी पदे भूषविणाऱया महिलांनी तो समज खोटा ठरविला आहे. निपाणीजवळील भिवशी येथे 20 नोव्हेंबर 1969 रोजी जोल्ले यांचा जन्म झाला. एकसंबा येथील आण्णासाहेब जोल्ले यांच्याशी विवाह झाल्यानंतर खऱयाअर्थाने हे दाम्पत्य समाजकारणात आणि पुढे राजकारणात सक्रिय झाले.
शिवशंकर जोल्ले प्राथमिक व माध्यमिक शाळा, आशा ज्योती मतिमंद मुलांची वसतिशाळा, आशा ज्योती शिवणकाम व विणकाम प्रशिक्षण केंद्र, शिशुपालन केंद्र, कौटुंबिक सल्ला केंद्र, आझाद हिंद व्यायाम शाळा, नेहरु युवा केंद्र, बसवज्योती कला वाणिज्य व विज्ञान पदवीपूर्व महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कन्नड प्राथमिक प्रशिक्षण केंद्र, कला, विज्ञान व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय अशा अनेक संस्थांमधून उत्तम काम सुरू असतानाच या माध्यमांमुळे हजारो नागरिकांना रोजगारही मिळाले.
निपाणी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या निवडणुकीला उभे राहिल्या. पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना दुसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंतु 2013 मध्ये भरघोस मतांनी त्या निवडून आल्या व निपाणीच्या पहिल्या महिला आमदार झाल्या.
2018 मध्ये पुन्हा दुसऱयांदा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळविला. महिला व बालकल्याण खात्याचे मंत्रिपद सांभाळले. कोरोनाकाळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्या आज धर्मादाय खात्याच्या मंत्री आहेत. यामुळे राजकारणातून समाजकारण करत असतानाच एकूणच समाजाभिमुख विकास हे त्यांचे ध्येय आहे.
महिला असण्याचा सार्थ अभिमान : डॉ. अंजलीताई निंबाळकर

खानापूर तालुका हा एक महत्त्वाचा तालुका. गर्द वनराई, निसर्गरम्य परिसर, ही खानापूरची ओळख असली तरी तालुक्मयातील दुर्गम गावे, दुर्लक्षित रस्ते, वाहतूक अशी समस्यांची मालिका नेहमीच आहे. मात्र तालुक्मयाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. अंजली निंबाळकर यांनी विकासकामांमध्ये आघाडी घेतली.
आपल्या तालुक्मयाच्या समस्या विधानसभेत मांडतानाच बलात्कारासारख्या गंभीर विषयांवर चर्चा सुरू असतानाही सत्ताधारी पक्षाचे सदस्य बाकवाजवत असल्याचे पाहून त्यांनी सभाध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली आणि ही बाब गंभीरपणे घेण्यास सांगितली. महिलेवर होणाऱया अत्याचाराला महिलेलाच जबाबदार धरले जाते, याचा त्या कडाडून विरोध करतात. सरकार कोणतेही असो स्त्राrवरील अत्याचार, अन्यायाची दखल घेऊन तो दूर करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे, हे ठणकावून सांगण्याचा बाणेदारपणा त्यांनी दाखविला.
स्वतः डॉक्टर असल्याने महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. पोलीस खात्याचे संवेदनशीलकरण करण्याबरोबरच तरुण मुलांची नजर बदलण्यासाठी समुपदेशन गरजेचे आहे, असे त्या मानतात. कोरोना आणि महागाई या दोन्हींशी लढणाऱया सामान्य जनतेची फरफट सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बैलगाडीतून त्यांनी विधानभवनला धडक मारली. कोरोनाकाळात औषधांचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा आरोग्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांनी गोळय़ांचा साठा मंजूर करून घेतला.
तसेच 106 गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांना दिलासा दिला. स्व-खर्चाने मास्कचे वितरण करतानाच अन्नधान्याचे किटही वितरित केले. खानापूरसाठी स्वतंत्र एमसीएच हॉस्पिटल मंजूर करून घेणे, ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची बाजू. महिला असण्याचा सार्थ अभिमान आहे आणि कर्तृत्व गाजविण्यात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे महिला निश्चितपणे जातील, हा त्यांचा विश्वास आहे.
झोपडीमध्ये पोचायला हवा ज्ञानप्रकाश…
आदिवासी कातकरी समाजातील ज्योतीची शिक्षणासाठी तळमळ : मूलभूत सुविधांपासून वंचित

आभाळाची आम्ही लेकरे
काळी माती आई
असे काव्य ऐकताना किंवा म्हणताना छान वाटते. परंतु, प्रत्यक्षात अशा पद्धतीचे जीवन जगणे मात्र कठीण असते. तथापि, आजही याचपद्धतीने आभाळ पांघरून घेऊन जमिनीवर म्हणजेच उघडय़ावर संसार करणाऱया महिलांची व्यथा वेगळीच आहे. त्यांना महिला दिन म्हणजे काय? माहिती नाही. स्त्राrस्वातंत्र्य, समता, स्त्राr-पुरुष समानता यापासून त्या कोसो दूर आहेत. त्यामुळे अशा महिलांपर्यंत किमान मूलभूत सुविधा आपण पोहोचवत नाही, तोपर्यंत महिला दिन खऱयाअर्थाने कोठेच साजरा होऊ शकत नाही.
या महिला आहेत, खानापूर तालुक्मयातील माडीगुंजी गावच्या. हे गाव दुर्गम अशा ठिकाणीच वसलेले. वास्तविक, येथे असणाऱया स्त्राr-पुरुषांचे पूर्वज वानरमारी समाजाचे. जेव्हा अन्नाचा तुटवडा होता, तेव्हा हे पूर्वज माकड मारून खात असतं. हे आज ऐकतानासुद्धा धक्कादायक वाटते. त्यामुळेच की काय, आजसुद्धा या परिसरात माकडे दिसत नाहीत आणि चुकून दिसलीच तर या समाजातील लोकांपासून ती दूर पळतात.
अत्यंत अल्प असणाऱया या समाजातील महिलांचे जीवन आजही क्लेषदायकच आहे. शिक्षणापासून त्या महिला दूरच राहिल्या आहेत. त्यामुळे परिसरातील जंगल प्रदेशात जाऊन निलगिरीच्या झाडांची साल काढायची आणि झाड कापून त्याचे तुकडे करायचे. साधारण एक ट्रक भरला की तो कारखान्यांना पाठवून द्यायचा, हे या महिलांचे मुख्य काम. मात्र, साल काढण्यामुळे या महिलांच्या हाताला घट्टे तर पडले आहेतच, परंतु ते अत्यंत निबर झाले आहेत.
आज साधारण भाकरी-भाजी हे सहज उपलब्ध होणारे अन्न असे आपल्याला वाटते. परंतु, या महिलांना महिनोन्महिने भाकरी-चपाती करणे शक्मय नसते. त्यामुळे गोडधोडापासून त्या कोसो दूरच आहेत. सकाळी उठून काळा चहा पिणे आणि भात-आमटी खाऊन कामावर जाणे हा त्यांचा दिनक्रम आहे. अशावेळी घरातील लहान मुलांना मोठय़ा मुली सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या शाळेचा प्रश्न उद्भवतो. अशाही परिस्थितीत या कुटुंबातील ज्योती निकम या तरुणीने पीयुसी प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. तर तिची बहीण सोनी नववीपर्यंत शिकली असून तिचा विवाह झाला आहे.
आदिवासी कातकरी समाजातील ही कुटुंबे आजही सर्व सुविधांपासून वंचित आहेत. यांना डॉक्टर माहिती नाहीत, कोणी आजारी पडल्यास झाडपाल्याचाच वापर करतात. परंतु, त्याबद्दलही खात्री नसते. सणवार करता का? या प्रश्नावर पंचमीपासून सर्व सण आम्ही करतो, हे त्यांनी हिरीरीने सांगितले. परंतु, गोडधोड करता का? या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. कारण कोणतेही सणवार आल्यास परिसरात जाऊन लोकांकडून मागून घेऊन खाणे इतकेच त्यांना माहीत आहे. घरामध्ये विवाहित मुलगी किंवा सून असल्यास खरेतर अधिकच पंचाईत होते. कारण खासगीपणा असा मिळणे अशक्मय आहे.
सर्वात दुर्दैव आहे ते लहान मुलींचे. त्यांना शाळेला जाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. शाळेचे आकर्षण मुलींना आहे, हे विशेष. परंतु, शाळेच्या वाटेवरून ये-जा करताना त्यांना भीती वाटते. बऱयाचदा भावंडाला सांभाळण्यासाठी त्यांना घरी थांबावे लागते. अशाही परिस्थितीत ज्योतीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे, हे विशेष होय. आजपर्यंत अनेक जण येतात, निवडणुकीवेळी मते मागतात, फोटो काढून घेतात, परंतु प्रत्यक्षात आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही. आम्ही अशा ठिकाणी राहतो आहोत, हेसुद्धा अनेकांना माहीत नाही, ही या महिलांची खंत आहे.
मी शिकणार
ज्योतीने पीयुसीपर्यंत जांबोटीच्या वागळे कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. ती उत्तम क्रीडापटू आहे. कबड्डी, खो-खो यामध्ये तिने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. दुर्दैवाने ही बक्षिसे तिने एका ट्रंकेत ठेवून दिली आहेत. तिच्याशी बोलून तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिचे मन वळविले, तेव्हा मी तुम्हाला शब्द देते, मी शिक्षण घेणार आणि आईवडिलांना कामातून मुक्त करणार, अशी ग्वाही तिने दिली. अर्थात यासाठी आमचे सहकार्य तिला असणारच आहे. परंतु, अशा अनेक ज्योती आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे प्रकाश पडणे खूप आवश्यक आहे.
जिद्द, नेतृत्वगुणाच्या बळावर राजकारणात वेगळा ठसा : लक्ष्मी हेब्बाळकर

राजकारण म्हणजे गटबाजी, हेवे-दावे, उखाळय़ा-पाखाळय़ा असे मुळीच नाही. घरी बसून राजकारणाला नावे ठेवणाऱयांनी एकतर प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यावा अन्यथा ‘क्रियेवीण वाचाळता…’ याप्रमाणे राजकारण हा विषय चघळू नये. राजकारण हा किटीपार्टीमधील चर्चेचा किंवा घरात बसून टिप्पणी करण्याचा विषय नाही, हे महिलांनी लक्षात घ्यावे आणि राजकारणात येऊन हे क्षेत्रसुद्धा करिअरसाठी उत्तम आहे, ही मानसिकता रुजवावी…
ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर ‘तरुण भारत’शी बोलताना आपले मत ठामपणे सांगत होत्या. एक कार्यकर्ता ते आमदारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. परंतु, जिद्द आणि नेतृत्वगुण या बळावर त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटविला.
राजकारणातील प्रवेशामागे काही पार्श्वभूमी होती का? या प्रश्नावर तिसरीमध्ये असतानाच वर्गातील मॉनिटरपदाची निवडणूक मी जिंकले. कारण मला नेतृत्व करायला आवडते. पुढे वयाच्या 22 व्या वषी आमदारपदासाठी उभ्या असलेल्या मार्गारेट अल्वा यांना जाऊन थेट भेटले आणि स्वतःची ओळख करून दिली. त्यांनी माझे धाडस आणि नेतृत्व पाहून संपूर्ण प्रचारादरम्यान आपल्याबरोबर येण्याची संधी दिली. मी प्रचारात झोकून दिले. आगामी काळात नेतृत्व करण्यासाठीचा तो वस्तूपाठच होता, असे त्या म्हणाल्या.
महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा म्हणून मी काम करू लागले. जिल्हाध्यक्षही मी झाले असते. परंतु, पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी खोडा घातला. परंतु, माझे काम बघून मला पक्षाची राज्य सरचिटणीस केले गेले. संधी मिळाली की तिचे सोने करण्यासाठी मी सर्वतोपरी झोकून देते आणि म्हणूनच यशस्वी होते. अशी माझी धारणा आहे.
महिलांचा राजकारणातील सहभाग वाढत असला तरी महिला आरक्षणापासून आपण का दूर आहोत, या प्रश्नावर हा प्रस्ताव सर्वप्रथम काँग्रेसने आणला आणि लोकसभेमध्ये तो जिंकला. परंतु, राज्यसभेत कमी मते मिळाली, हे दुर्दैव होते. परंतु, किती दिवस तुम्ही आम्हाला रोखणार आहात. आता 33 टक्के नव्हे तर 50 टक्के आरक्षण मिळणारच, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
राजकारणात महिलांना आजही संघर्ष करावा लागतो का? व हे क्षेत्र करिअर म्हणून निवडले जात नाही, याचे कारण काय, या प्रश्नावर त्याकाळी घटना लिहितानासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांची मते विचारात घेतली होती. त्यामुळे महिलांचे महत्त्व तेव्हापासून आहे. कोणी नाकारले म्हणून ते कमी होत नाही. दुसरी बाब म्हणजे राजकारण म्हणजे अपवित्र असे मानणे चूक आहे.
राजकारणाला नावे ठेवताना ते सर्वत्र असते, याचे भान ठेवले पाहिजे. ‘किचन पॉलिटिक्स’, ‘बिझनेस पॉलिटिक्स’ सर्वांनाच माहीत आहे. महिला आणि संघर्ष हा दृढ संबंध आहे. संघर्ष करतच त्यांना पुढे जावे लागणार आहे आणि लढणे हा तर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. परिवर्तन हवे असेल तर महिलांनी राजकारणात झोकून द्यायला हवे आणि या माध्यमातून समाजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकांच्या टीकेने दुखावल्या जाता का? घर आणि राजकारण हा डोलारा कसा सांभाळला जातो? या प्रश्नावर टीकेमुळे पूर्वी मी खूप दुःखी होत असे. परंतु, आता मला सवय झाली आहे. एका स्त्राrला करिअर करताना कुटुंबीयांचा पाठिंबा मिळणे खूप आवश्यक आहे. सततचे फोन, कार्यकर्ते, समस्या, अडीअडचणी ऐकणे याची मला सवय झाली आहे. वेगळी शांतता हवी आहे, असे मला वाटत नाही. कारण माझ्या सभोवती लोक नसतील तर मी जगूच शकणार नाही. असे सांगतानाच महिलांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, शिस्तीचे पालन करावे आणि आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
पतीचा आदर्श समोर ठेवून वाटचाल – खासदार मंगला सुरेश अंगडी

सहचाराची साथ सुटल्यानंतर मिळालेले खासदारपद मिरविणे खूप कठीण जाते. परंतु, त्यांनी केलेले काम, त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी निवडणुकीला उभी राहिले. पदोपदी ‘ते’ माझ्यासोबत आहेतच, त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेवून माझी वाटचाल सुरू आहे. या भावना आहेत खासदार मंगला अंगडी यांच्या…
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे यंदाचे घोषवाक्मय आहे, ‘वुमन ईन लीडरशीप’. यानिमित्ताने नेतृत्व करणाऱया महिलांशी संवाद साधला. त्यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी वरील भावना व्यक्त केल्या. अचानक राजकारणात झालेला प्रवेश सोपा वाटतो का? या प्रश्नावर राजकारणाची तशी माहिती आहे. कारण माहेरची पार्श्वभूमी राजकीयच आहे. माझे वडील घटप्रभा साखर कारखान्याचे पहिले चेअरमन होते. चुलत भाऊ व्ही. एस. कौजलगी राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे राजकारण नवखे नव्हते. सुरेश अंगडी यांच्याशी विवाह झाल्यानंतर ते तर प्रत्येक निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. कार्यकर्त्यांचा राबता, नेत्यांबरोबरच्या चर्चा यांची मी साक्षीदार असल्याने मला राजकारणात येणे कठीण वाटले नाही, असे त्या म्हणाल्या.
अचानक आलेली जबाबदारी कठीण आहे का? या प्रश्नावर वास्तविक अशा पद्धतीचा बदल कोणालाच आवडणारा नाही. खूप विचित्र पद्धतीने राजकारणात माझा प्रवेश झाला. तोसुद्धा माझा जोडीदार निघून गेल्याने. ही खंत किंवा वेदना कायम आहेच. परंतु, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आग्रह मोडणे शक्मय नव्हते. त्यामुळे ही जबाबदारी घेतली आहे. ती कठीण असली तरी न पेलण्याइतकी अशक्मयही नाही, असे त्या म्हणाल्या.
महिला राजकारणात असूनही अद्यापही 33 टक्के आरक्षणापासून आपण का दूर आहोत? या प्रश्नावर, होय, ही खंत आहे. 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राजकारणात महिला अल्पसंख्येने आहेत, याकडे लक्ष वेधता हळूहळू ही संख्या निश्चित वाढणार असल्याचे सांगितले.
रोजगारामुळे महिलांचे सक्षमीकरण
काकतीत सामाजिक वनीकरणाचे काम करणाऱया महिलांशी साधला संवाद : ग्रामीण भागातील महिला बनल्या सबला
आज महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला, पुरुषांपेक्षाही अधिक काम करीत होत्या. मात्र, सामान्य महिला म्हणून घरच्या नियोजन प्रक्रियेत समान संधीपासून दूर होती. रोजगार हमी योजनेतील कामामुळे या महिलांच्या हाती पैसा आला. पुरुषांच्या बरोबरीने निर्णय प्रक्रियेत महत्त्व आल्याने गावच्या विकासकार्यात भाग घेऊन जाब विचारत आहेत. स्त्राr-पुरुष असमानता नष्ट झाली असून महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. यंदाच्या महिला दिनाची थीम ‘एक शाश्वत उद्यासाठी आजची लैंगिक समानता आहे.’ लिंगभेद मोडण्यासाठी रोजगार हमी योजनेतून आर्थिक व वैचारिक पातळीवर ग्रामीण महिला शाश्वत भविष्य घडविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यादृष्टीने काकती येथे प्रत्यक्ष सामाजिक वनीकरणाचे काम करीत असताना ‘तरुण भारत’शी महिलादिनी साधलेला सुसंवाद.
शेतीकामात मजुरी कमी : सुमन देवानंद नरेगावी

शेतामध्ये पुरुषाच्या बरोबरीने कामे करत होते. शेतीकामात मिळणारी मजुरी पुरुषांपेक्षा कमी होती. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा आम्ही परावलंबी होतो. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने त्यांच्यावर अवलंबून असल्याने आमचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते. रोजगार हमी योजनेतून मिळणाऱया मजुरीमुळे मी सक्षम झाले आहे.
रोहयोमुळे आर्थिक बाबतीत स्वावलंबी : वैशाली सोमनाथ रुटकुटे

रोजगार हमी योजनेतील कामामुळे आर्थिक बाबतीत मी स्वावलंबी झाले आहे. यापूर्वी मी अबला आहे असा विचार करून स्वतःला पुरुषवर्गापेक्षा कमी समजत होते. पण आता कौटुंबिक आर्थिक व्यवहारासह आपले घर पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या विचारांनाही महत्त्व आले आहे. आता पुरुषांबरोबर समान अधिकार आहेत, याची जाणीव झाली. हे सामर्थ्य रोजगार हमी योजनेत काम करणाऱया सर्व महिला भगिनींना आले आहे. रोजगार हमी योजना शेतकऱयांच्या खरीप व सुगी हंगामात सरकारने राबविल्यास शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
श्रमाचे फळ आम्हाला मिळतेय : शिला विनायक अष्टेकर

रोजगार हमी योजनेमुळे मी व माझ्या भगिनी सक्षम व सबल झालो आहोत. इथे सामाजिक वनीकरणातून रोपे लावण्यासाठी खड्डे खोदाई करीत आहोत. लावलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या कामातून मिळणारी मजुरी पुरेशी असून आर्थिक सुबत्ता आल्याने आपणही सामाजिक, कौटुंबिक अन्यायाविरुद्ध उभ्या राहू शकतो, असे आत्मिक बळ निर्माण झाले आहे. महिला दिन असला तरी काम करीत राहणार आहोत. श्रमाचे फळ आम्हाला मिळते, यातच आम्हा ग्रामीण महिलांना खरा आनंद आहे.









