सेन्सेक्स 15.12 तर निफ्टी 13.90 टक्क्मयांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात तेजीची झुळूक राहिली आहे. जागतिक बाजारात मंदीचा कल आणि देशातील कोविड19 ची वाढती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर बाजाराने सकारात्मक कामगिरी केली आहे.
अंतिम दिवशी शुक्रवारीही बाजारातील तेजीचा प्रवास कायम राखत सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात तेजीची हलकीशी नोंद करत बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स 15.12 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,040.57 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 13.90 अंकांनी तेजी प्राप्त करत 11,214.05 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे चार टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक व मारुती सुझुकीचे समभाग नफ्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टायटन, एचसीएल टेक, इन्फोसिस, सन फार्मा आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक घडामोडींमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेतील सूचीबद्ध चीनच्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असून याच बातम्यांच्या परिणामामुळे जागतिक बाजारांचा कल नकारात्मक राहिला आहे. त्याचे थेट परिणाम देशातील शेअर बाजारांमध्ये दिसून येत आहेत.
वरील घडामोडींसोबत कोविड19 च्या वाढत्या संख्येमुळेही गुंतवणूकदार चिंतेत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. कारण देशात मागील 24 तासात कोरोना विषाणुची रुग्णसंख्या 60,000 पेक्षा अधिक झाली आहे. यामुळे आगामी काही दिवसही शेअर बाजारात दबावाचे वातावरण राहण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसँश आणि जपानचा निक्की हे घसरणीत राहिले आहेत तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी नफ्यात राहिला आहे. बेंट कच्चे तेल 0.86 टक्क्मयांनी नुकसानीत राहून 44.70 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे.








