प्रतिनिधी / बेळगाव
संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जागतिक नेत्रदानदिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टिचर्स कॉलनी, विनायकनगर येथील बागेजवळ सायंकाळी 5 ते 7 या वेळेत फिरायला येणाऱया जाणाऱया नागरिकांना महत्व पटवून शंका दूर करून नेत्रदानाचा संकल्प करण्यास प्रवृत्त केले. यावेळी ट्रस्टच्या वतीने लिहिण्यात आलेले जीवनदान हे अवयव दानाची संपूर्ण माहिती देणारे पुस्तक वाटण्यात आले. नेत्रदानाचे महत्व पटल्याने व आपण समाजचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून खालील व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. मनोहर बाबूराव यादव, बाळासाहेब पाटील, गजानन तुकाराम पवार, राजेंद्र भाऊराव देसाई, अरूण महादेव बडीगेर, प्रशांत महादेव बडीगेर, अजय जाधव, परशराम आजरेकर, वैभव आबासाहेब देसाई, स्नेहा वैभव देसाई, शिवराज संभाजीराव वेसने, अशोक तुकाराम पवार, ट्रस्टच्या वतीने सर्वांचे आभार माणून त्यांच्यासाठी दीर्घायुष्य चिंतण्यात आले. नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान इत्यादीसाठी संजीव देसाई यांच्याशी फोन नंबर 98706 88260 वर संपर्क साधावा असे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.









