अनगोळ नाका ते तिसऱया रेल्वेगेटपर्यंत अडथळय़ांची शर्यत : पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील, एलऍण्डटीच्या अनियोजित कामाबाबत तक्रारी
प्रतिनिधी / बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने गेल्या चार वर्षांपासून येथील एका बाजूचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. अशातच आता दुसऱया बाजूच्या रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई सत्र सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
एलऍण्डटीच्या अनियोजन कामाबद्दल शहरात तक्रारी सुरू आहेत. अशातच आता खानापूर रोड परिसरात जलवाहिन्या घालताना कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. याचा फटका वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी रस्ता बंद असल्याने एका बाजूने सर्व वाहतूक वळविण्यात आली आहे. आता दुसऱया बाजूच्या रस्त्यावरदेखील खोदाई करण्यात येत असून निम्मा रस्ता शिल्लक राहिला आहे. खानापूर परिसरातून येणाऱया अवजड वाहनांसह वाळू वाहतूक करणारी वाहने, उद्यमबाग औद्योगिक वसाहतींमध्ये ये-जा करणाऱया अवजड वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या निम्म्या रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी होत आहे. येथील फुटपाथवर जनरेटर व इतर साहित्य ठेवण्यात आल्याने पादचाऱयांना जाण्यासाठीदेखील रस्ता नाही. सध्या रस्त्यावर अडचणी निर्माण झाल्या असून वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले तरी हा रस्ता बंदच ठेवण्यात आला आहे. परिणामी वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यापूर्वी बंद असलेला रस्ता खुला करण्याची आवश्यकता आहे. मात्र कोणतेच नियोजन न करता खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. अधूनमधून येणाऱया पावसामुळे चिखल निर्माण होत असून रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तिसरे रेल्वेफाटक ते अनगोळ नाक्मयापर्यंतच्या रस्त्यावर अडथळय़ांची शर्यत नागरिकांना पार करावी लागत आहे.
बंद असलेला रस्ता खुला करावा
कोणतीही विकासकामे राबविताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येणार नाहीत. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र सर्व नियम आणि नागरिकांच्या अडचणींकडे कानाडोळा करीत विकासकामे राबविण्याचा सपाटा कंत्राटदारांनी चालविला आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. येथील जलवाहिनी उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाला जोडण्यात येणार असून हे काम आणखी चार दिवस चालण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बंद असलेला रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.









