प्रतिनिधी/ रत्नागिरी
जयगड येथील आंग्रे पोर्टवरील बोटींवरील चादर, बेडशिट आदी सामान फिनोलेक्स कॉलनी समोरील शिरगावच्या हद्दीत टाकण्याचा प्रकार समोर आला आह़े याघटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े आंग्रे पोर्टवरील बोटींवरील खलाशी कोरोना पॉ†िझटिव्ह आढळून आले होत़े मात्र जयगड येथून सामान टाकण्यासाठी शिरगावात येण्याचे कारण अद्याप समजून आलेले नाह़ी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टॅम्पो (एमएच 08 एपी0645) हा संशयास्पदरित्या फिनोलेक्स कॉलनी समोरील जागेत आढळून आल़ा यावरील चालक हा गाडीतील सामान हे रस्त्याकडेला टाकत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल़े यावेळी ग्रामस्थांनी टॅम्पो चालकाला त्याठिकाणीच थांबवून ठेवत घटनेची माहिती शहर पोलिसांना दिल़ी
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टॅम्पोवरील सामाना हे जयगड येथील आंग्रे पोर्टवरील बोटींवरील चादर व बेडशिट आहेत़ या बोटींवरील खलाशांना कारोनाची लागण झाल्याचे नुकतेच तपासणीत आढळून आले होत़े त्यामुळे हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आह़े दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े









