बेळगाव : / प्रतिनिधी
तांगडी गल्ली, कपिलेश्वर रोड येथील प्रतिष्ठित रहिवासी शांता नागेश चव्हाण (वय 72) यांचे सोमवार दि. 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित कन्या, एक विवाहित मुलगा, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. तरुण भारतचे आयटी व्यवस्थापक जयंत चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.
सोमवारी रात्री त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.









