ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांचा तिढा आता सुटला आहे. हद्दवाढ आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत जम्मू विभागातील विधानसभेच्या सहा आणि काश्मीरमधील एका जागा वाढविण्यात आली आहेत. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या जागा पुन्हा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हद्दवाढ आयोगाची आज बैठक झाली. या बैठकीत आयोगाने आपल्या पाचही सहयोगी सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जम्मू विभागातील विधानसभेच्या सहा आणि काश्मीरमधील एका जागा वाढविण्याच्या पुनर्विचारावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
जम्मू-काश्मीरमधील अनुसूचित जातांसाठी नऊ आणि अनुसूचित जमातींसाठी सात जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एसटीसाठी जागा राखीव राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश होता. सीमामर्यादा आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे पॅनेलचे पदसिद्ध सदस्य आहेत.









