ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 1,184 नवे रुग्ण आढळून आले. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 02 हजार 651 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 421 आणि काश्मीर मधील 763 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 21 हजार 817 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 4,178 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 2 लाख 76 हजार 733 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1,05,462 रुग्ण जम्मूतील तर 1,71,271 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 4,101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 1993 जण तर काश्मीरमधील 2108 जणांनी आपला जीव गमावला आहे.









