ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 490 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 20 हजार 359 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 143 आणि काश्मीर मधील 347 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 765 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1913 आणि काश्मीरमधील 5852 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 12 हजार 217 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2503 रुग्ण जम्मूतील तर 9714 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 377 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 28 जण तर काश्मीरमधील 349 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 3 लाख 68 हजार 806 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 46 हजार 478 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 765 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.