ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 586 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 90 हजार 752 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 206 आणि काश्मीर मधील 380 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 842 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- 81,486 रुग्ण कोरोनामुक्त !
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 684 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 81,486 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 33,229 रुग्ण जम्मूतील तर 48,257 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1424 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 472 जण तर काश्मीरमधील 952 जणांनी आपला जीव गमावला आहे.









