टोकियो
जपानचे युवराज फुमिहितो यांनी स्वतःची मुलगी माको हिला तिचा प्रियकर केई कोमुरो याच्याशी विवाह करण्याची अनुमती दिली आहे. दोघांचा विवाह दीर्घकाळापासून रखडला होता. राजकन्या माको 2018 मध्ये स्वतःचा महाविद्यालयीन मित्र कोमुरो याच्याशी विवाह करणार होत्या. कोमुरो हे राजघराण्याशी संबंधित नसल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे हा विवाह लांबणीवर पडला होता. जपानचे राजे नरुहितो यांचे कनिष्ठ बंधू युवराज फुमिहितो यांनी विवाहापूर्वी आर्थिक अडचणी दूर करण्याचे सांगितले होते. विवाह केल्यावर माको यांना राजघराण्याचे सदस्यत्व गमवावे लागणार आहे.









