जांभेकर विद्यालयाच्या तेजसची कहाणी
प्रवीण जाधव/ रत्नागिरी
जन्मतःच मिळालेले दिंव्यगत्व आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही रत्नागिरीतील गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या तेजस प्रकाश चिचकर याने दहावीच्या परिक्षेत 89 टक्के मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावल़ा तेजस याच्यावर लहान वयातच 5 शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ एकाबाजूला जगण्यासाठी संघर्ष असतानाच त्याचे हे यश सर्वांसाठीच प्रेरणादाई आह़े
तेजस हा मुळचा गुहागर तालुक्यातील कांजूर्ली कुंभारमळा येथील आह़े त्याचे वडील रत्नागिरीतील खासगी कंपनीत कार्यरत असल्याने तो रत्नागिरीत वास्तव्यास आह़े तेजस जन्मतःच दिंव्याग असल्याने तो गावी आजी-आजोबा, काका-काकी यांच्यासोबतच राहत होत़ा 3 ते 7 या लहान वयातच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल़ी या परिस्थितीलाही तेजसने हिमतीने तोंड दिल़े त्यानंतर तेजसला आई-वडील आपल्यासोबत रत्नागिरी येथे घेऊन आल़े
तेजसला शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये शासकीय नियमानुसार वयानुसार थेट 6 वी मध्ये प्रवेश देण्यात आल़ा तेजसची अभ्यासात प्रगती कशी होणार याची पालकांबरोबरच शिक्षकांनाही काळजी होत़ी मात्र आजीने त्याचा घरीच चांगला अभ्यास घेतला होत़ा, नातवाला शिक्षणाची गोडी लावली होती. याचा फायदा तेजसला मिळाला आणि तो सहजपणे पुढील वर्गात गेला.
सातवीला चांगले गुण मिळवून तेजस शहरातील गोदुताई जांभेकर विद्यालयात दाखल झाल़ा चालता येत नाही, केवळ बसू शकतो अशा परिस्थितीत त्याने अभ्यासामधले लक्ष कमी होवू दिले नाह़ी जांभेकर विद्यालयातील शिक्षकांनीही तेजसला सर्वतोपरी मदत केली. त्याचेच फळ म्हणून तेजसला दहावीमध्ये 89 टक्क्s गुण मिळाल़े एवढेच नव्हे तर त्याने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल़ा प्रतिकूल परिस्थितीडी झगडून तेजसने मिळविलेले सश सर्वांसाठीच प्रेरणादाई आह़े
कौतुक आणि अभिमानही…!
तेजस याला जन्मतःच दिंव्यगत्व आह़े त्याला चालता येत नाही फक्त तो बसू शकत़ो अशा परिस्थितीत देखील अभ्यासातली त्याची आवड सर्वच शिक्षकांसाठी कौतुकाचा विषय होत़ा शाळेची सर्व शिस्त पाळून तेजसने कठोर परिश्रम घेतल्याचे फळ त्याला †िमळाल़े आम्हाला त्याचे कौतुक आणि अभिमान आहे.
— अनिल चव्हाण,
मुख्याध्यापक स़ौ गोदुताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी









