चित्रपटाचे मोशन पोस्टर केले शेअर
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. नुसरतने आता ‘जनहित में जारी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. ‘एक वुमनिया सब पर भारी, यह सूचना जनहित में जारी है’ ही चित्रपटाची पंचलाइन तिने कॅप्शनच्या स्वरुपात सादर केली आहे.
या चित्रपटाची निर्मिती भानुशाली स्टुडिओज लिमिटेडकडून केली जात आहे. निर्माते विनोद भानुशाली आणि लेखक राज शांडिल्य यांनी पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली होती. नुसरत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यात आले आहे.
चित्रपटात नुसरतसोबत अन्नू कपूर, अनुद ढाका आणि परितोष त्रिपाठी हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट विनोदी धाटणीचा आहे. ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी याची पटकथा लिहिली आहे. तर जय बंटू याचे दिग्दर्शन करत आहेत. नुसरत याचबरोबर अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’, तर सनी कौशलसोबत ‘हुडदंग’ यासारख्या चित्रपटांमधून झळकणार आहे.









