सोलापूर / प्रतिनिधी
महाआघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकसंघता नसल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई नाही, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या वीज बिलावर निर्णय नाही. हे सरकार केवळ बोलघेवडे आहे, जनतेला कर्मयोगी सरकार हवयं. महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्य जनता सरकारनी केलेल्या घोषणाबाजीच्या पूर्ततेच्या प्रतिक्षेत आहेत. वीज थकबाकीबाबत मागील 15 वर्षाची चौकशी करावी, चौकशीत हे सरकार तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाचे संग्राम देशमुख व शिक्षक मतदार संघाचे जितेंद्र पवार या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर दौर्या दरम्यान हेरिटेज गार्डन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतले. या मेळाव्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी खा. डॉ. जयसिध्देश्वर महाराज, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृहनेता श्रीनिवास करली, उपमहापौर राजेश काळे आदी उपस्थित होते़
फडणवीस पुढे म्हणाले की, शेतकर्यांना 25 ते 50 हजारांची नुकसान भरपाईची नुसतीच घोषणा झाली. त्यानंतर सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा वीजबिल माफीची घोषणा केली तेथेही मंत्र्यात समन्वय नसल्याने त्याचे खापर भाजपवर फोडण्याचा प्रयत्न केले. वीज थकबाकीची चौकशी करायची असेल तर मागील 15 वर्षाची करावी. ते स्वतःच तोडावर आपटतील. फळबागा उद्धस्त झाल्या, खरीप पिके गेली, शेतातली मातीवाहून गेली ते शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. नुसतेच पोकळ आश्वासनाने जनता भूलत नाही, येत्या मतदानातून जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. मात्र कार्यकर्त्यांनी मतदारांसह सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजावून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सुसंवाद साधावा, असे आवाहनही फडणवीस यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









