किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : दक्षता हॉस्पिटलमध्ये हेल्थकार्डचा शुभारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. निरोगी आरोग्यासाठी आपण काय करू शकतो, याचे आत्मचिंतन करायला हवे. जेव्हा आपली प्रकृती उत्तम असते तेव्हाच आपण सामाजिक कार्य करू शकतो. दक्षता हॉस्पिटलने सुरू केलेली ‘हेल्थ कार्ड’ची योजना स्वागतार्ह असून जनतेला आरोग्य सेवा देण्यावर नेहमी भर द्या, असे विचार तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी क्यक्त केले.
खानापूर रोडवरील दक्षता हॉस्पिटलतर्फे बुधवारी हेल्थकार्डचा शुभारंभ किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. रवी रानडे, डॉ. श्रीधर शेट्टी, डॉ. सी. ओ. धाकोजी, डॉ. शिरीष वागळे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. श्रीधर शेट्टी यांनी स्वागत केले. डॉ. आसावरी संत यांनी किरण ठाकुर यांचा परिचय करून दिला. यानंतर किरण ठाकुर व अन्य मान्यवरांच्या हस्ते हेल्थकार्डचा शुभारंभ करण्यात आला. पहिले हेल्थकार्ड किरण ठाकुर यांनीच घेतले.
यावेळी ते म्हणाले, डॉक्टर आपल्या अवतीभोवती असतातच. परंतु आपणसुद्धा योग साधना, सायकलिंग, जलतरण, चालणे असे व्यायाम केले पाहिजेत. पूर्वी फॅमिली डॉक्टर हे महत्त्वाचे मानले जात. आज फॅमिली डॉक्टरांची संख्या कमी होत आहे. डॉक्टर आपले काम चोख बजावत असताना केवळ गैरसमजुतीमुळे त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार घडतात. ही अत्यंत चुकीची बाब असून डॉक्टरांनी संघटित राहणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ. डी. पी. वागळे, डॉ. अंजली चिकोडी, डॉ. कौलगुड, डॉ. अजित वणकुदे, डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. श्रीकांत परुळेकर, प्रशासक संजीव लिंगमूर्ती आदी उपस्थित होते.
लोकमान्यद्वारे 30 गावे दत्तक लोकमान्यद्वारे आम्ही 30 गावे दत्तक घेतली असून दोन वेळा मुंबईच्या डॉक्टरांना निमंत्रित करून दहा लाख रुपयांची औषधे वितरित केली आहेत. 3500 जणांना प्रत्येकी 1500 रुपयांचे चष्मे वाटप केले आहेत. लोकमान्यने रुग्णांसाठी रुग्ण वाहिकासुद्धा उपलब्ध केली आहे. ज्याला जे शक्मय आहे त्याने समाजासाठी ते केले पाहिजे. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी जीव धोक्मयात घालून काम केले आहे. आज लहान हॉस्पिटल्सची गरज आहे. हा प्रयत्न दक्षताने केला असून हेल्थकार्डअंतर्गत काही तपासण्यांचाही अंतर्भाव करावा, असेही किरण ठाकुर यांनी सुचविले.









