ऑनलाईन टीम
आयपीएल 2021 मध्ये मुंबईत झालेल्या हाय होल्टेज सामन्यात धोनी ब्रिगेडने विराट सेनेचा विजयरथ रोखला. रविंद्र जडेच्या वादळी खेळीच्या बळावर चेन्नईने 191 धावांचा डोंगर उभारला. त्याचा पाठलाग करताना बेंगरुळचा संघ 9 गड्यांचा मोबदल्यात 122 धावापर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तब्बल 69 धावांनी चेन्नईने हा सामना जिंकला. बेंगरुळवरील या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डुप्लेसीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ऋतुराज 33 धावा करून परतला तर डुप्लेसीने 41 चेंडूत 50 धावा केल्या. सलामीवीरांनी दिलेल्या 74 धावांच्या भागिदारीमुळे चेन्नई मजबूत स्थितीत होती. परंतु, हर्षल पटेलने रेना आणि डुप्लेसीला पाठोपाठ बाद केले. त्यामुळे धावसंख्या मंदावली. परंतु, शेवटी आलेल्या रविंद्र जडेजारुपी वादळामुळे बेंगरुळची दाणादाण उडाली. शेवटच्या षटकात जडेजाने पर्पल कॅपचा मानकरी असणाऱ्या हर्षल पटेलची चांगलीच धुलाई केली. तब्बल 5 षटकार आणि एका चौकाराची आतषपाजी करत तब्बल 37 धावा फटकावल्या. त्यामुळे चेन्नईने 191 धावांचा डोंगर उभारला.
प्रत्युत्तरात बेंगरुळला चांगली कामगिरी करता आली नाही. भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने बेंगरुळला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, आजचा सामना २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट करत रविंद्र जडेजाने एकहाती जिंकला.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 1071नवे रुग्ण तर 31 बळी
Next Article सचिनची कोरोनावर मात









