पहिल्या 20 मध्ये मिळाले स्थान
वृत्तसंस्था / बेंगळूर
औषध कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या प्रमुख किरण मुजूमदार शॉ यांचा सलग सहाव्यांदा बायोफार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये इनोव्हेटीव्ह आणि इंस्पिरेशनल लीडर म्हणून समावेश झाला आहे. मेडिसिन मेकर पॉवर 2020 ची यादी नुकतीच सादर करण्यात आली असून पहिल्या 20 मध्ये शॉ यांनी स्थान पटकावले आहे, अशी माहिती बेंगळूर येथील बायोकॉन कंपनीकडून देण्यात आली आहे. एका भारतीय महिलेने मिळवलेले स्थान कौतुकास्पद म्हणायला हवे.
सदरच्या यादीत प्रामुख्याने मेडिसिन विभागात विशेष काम करणाऱयांचा समावेश केला जातो. मेडिसिन मेकर पॉवर 2020 च्या यादीत अशा 60 लोकांची नावे असल्याचे सांगितले आहे. अणू, बायोफार्मास्युटिकल आणि ऍडव्हान्स मेडिसिन क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱयांचा समावेश यात करण्यात आला आहे.
सहाव्यांदा यादीत
पहिल्यांदाच शॉ यांचा या यादीत समावेश करण्यात आला नसून शॉ या प्रेरणादायक कार्यशैलीमुळे सन 2015 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा या यादीत समाविष्ट झाल्याची नोंद आहे.








