ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.36 कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 2 कोटी 36 लाख 08 हजार 794 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 12 हजार 812 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी जगभरात 2 लाख 06 हजार 730 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2.36 लाख बाधितांपैकी 1 कोटी 61 लाख 740 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 66 लाख 95 हजार 242 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 453 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 58 लाख 74 हजार 295 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 31 लाख 67 हजार 164 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 80 हजार 605 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 36 लाख 06 हजार 783 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 27 लाख 09 हजार 638 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 14 हजार 772 जणांचा मृत्यू झाला आहे.









