ऍप ऍनालिस्ट फर्म सेंसर टॉवर यांची आकडेवारी सादर : गुगल प्ले -ऍपल स्टोरचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील वर्षभरात जगभरात गुगल प्ले आणि ऍपल ऍप स्टोर यावर ख्रिसमसच्या दिवसापर्यंत मोबाईल ऍप्सवर 2,988 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती ऍप ऍनालिस्ट फर्म सेंसर टॉवर यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे. यामध्ये वर्षाच्या आधारे 2019 च्या तुलनेत पाहता 34.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षात यामध्ये जवळपास 2,221 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. ख्रिसमसमध्ये अधिकचा खर्च गेमिंग ऍप्सवर करण्यात आला आहे.
जगभरातील मोबाईल ग्राहकांनी मोबाईल ऍप्सवर वर्षाच्या आधारे तुलना केल्यास जवळपास 17.7 टक्क्यांचा खर्च करण्यात आला आहे. 2019 मध्ये ख्रिसमसमध्ये ऍपवर 1,702 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
बिगर गेमिंग ऍपवरील खर्च 4.2 टक्क्यांनी तेजीत
ग्राहकांनी बिगर गेमिंग ऍप्सवर जवळपास 820 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये 2019 रोजी 516 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. सरासरी वर्षाच्या तुलनेत ही वाढ 59 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली असून एकूण खर्चाची
वाढ मात्र 4.2 टक्क्यांनी वधारली आहे.
गेमवर सर्वाधिक खर्च
ग्राहकांनी ख्रिसमसवर टेंसेंट गेम्सच्या ऑनर ऑफ किंग्स गेमवर सर्वाधिक खर्च केला आहे. सेंसर टॉवरच्या अहवालानुसार मल्टीप्लेअर ऑनलाईन बॅटल एरेना गेम यांनी 78.3 कोटींची कमाई केली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 205.7 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2019 मध्ये याच दिवशी जवळपास 25.6 कोटींची कमाई केली होती.









