ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात आतापर्यंत 4 कोटी 02 लाख 78 हजार 207 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 3 कोटी 01 लाख 12 हजार 204 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी जगभरात 3 लाख 24 हजार 927 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 3971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 90 लाख 47 हजार 682 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 71 हजार 995 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 11 लाख 18 हजार 321 जणांचा बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 83 लाख 87 हजार 799 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 54 लाख 57 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 24 हजार 730 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 75 लाख 48 हजार 238 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 66 लाख 59 हजार 895 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 14 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे.









