ऑनलाईन टीम / बर्लिन :
जगदविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनाच्या भीतीने जर्मनीत अडकून पडला आहे. SC Baden ooo या बुद्धिबळ स्पर्धेसाठी विश्वनाथ आनंद फेब्रुवारीमध्ये जर्मनीला गेला होता.
जर्मनीतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विश्वनाथन आनंद यांनी मागील आठवडय़ापासूनच इतरांपासून स्वतःला वेगळे ठेवले आहे. सोमवारी (दि. 16 मार्च) तो भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या धास्तीने त्यांचे मायदेशी परतणे लांबणीवर पडले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विश्वनाथन आनंद म्हणाला, कोरोनामुळे मी जर्मनीत अडकलो आहे. सध्या सोशल मीडियावरुन मी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींशी संपर्क साधत आहे. हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे.









