ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याची मोठी बहीण हमीदा सय्यदचा कोरोनामुळे मुंब्रा येथील रुग्णालयात मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्या 57 वर्षांच्या होत्या. दरम्यान, छोटा शकील याच्या धाकट्या बहिणीचा मागच्या महिन्यातच हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हमिदावर गेल्या आठवड्यापासून उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. छोटा शकीलच्या पाच भावंडांपैकी हमीदा दुसरी. तिचे लग्न मुंब्रा येथील व्यापारी फारुक सय्यद याच्याशी झाले होते. फारुखचे कोणतेही अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. राज्यात 1 लाख 10 हजार 700 पेक्षा अधिक रुग्ण असून आतापर्यंत 4 हजार पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे.









