प्रतिनिधी / बेळगाव
येथील छत्रपती सेवा संघ बेळगावच्या महिला मंडळाची किल्ले राजगड, प्रतापगड, रायगड, सिंहगड गडकोट मोहीम यशस्वीपणे पार पडली. प्रारंभी गुंजवणे येथील गणेश मंदिरात प्रेरणा मंत्र सादर करून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पद्मावती येथे महिलांनी मुक्काम करून दुसरे दिवशी किल्ले रायगड दर्शनासाठी चित्त दरवाजापासून सुरुवात करण्यात आली. महा दरवाजामार्गे रायगड उतरुन प्रतापगडास मोहीम पोहचली.
प्रतापगडावरील तुळजाभवानी मंदिर, कडेलोट, कुस्तीचा आखाडा, चोरवाट, हस्तकला प्रदर्शन, रहाट तलाव, शिवछत्रपतीचा अश्वारुढ पुतळा हे करत मोहीम सिंहगडावर पोहचली. सिंहगडावरील तानाजी मालुसरे स्मारक, राजाराम महाराज समाधीचे दर्शन घेऊन ध्येयमंत्राने मोहिमेची यशस्वी सांगता करण्यात आली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम पार पडली. सदर मोहिमेत प्रियेश गौंडाडकर, शिल्पा शहापूरकर, रेश्मा वेसणे, श्रद्धा राणे, तेजश्ा़खाr राणे, शुभांगी पाटील, वर्षा हंगीरगेकर, स्नेहल हंगीरगेकर, नम्रता गौंडाडकर, अनुष्का शहापूरकर, सायली वेसणे, रघुनाथ राणे, सागर राणे, यशराज वेसणे, रवि गौंडाडकर, शौर्य जाधव, सुशांत, श्लोक हंगीरगेकर, व्यंकटेश किल्लेकर, निखिल पाटील, प्रियेश गौंडाडकर, अभिषेक देवलापूरे, बसवंत किल्लेदार, स्वयम गौंडाडकर तसेच आयुष पाटील, माही राणे, ऋचा, साईश, अनय गौंडाडकर इ. शिवभक्त उपस्थित होते.









