ऑनलाईन टीम / सुकमा :
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या कोब्रा फोर्समध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, आयईडी स्फोटात एक कमांडो जखमी झाला आहे. सीआरपीएफचे आयजी डी प्रकाश यांनी यासंदर्भात माहिती दिली.
डी प्रकाश म्हणाले, सुकमामधील किश्राम पोलीस स्टेशन भागात असलेल्या वनक्षेत्रात कोब्रा फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. दुपारी एकच्या सुमारास या भागात आयईडी स्फोट झाला. या स्फोटात कमांडो बटालियन फॉर रेसोल्यूट ऍक्शनच्या (कोब्रा) 208 व्या बटालियनचा एक जवान जखमी झाला. त्याला हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या परिसरात कोब्रा आणि सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) चे अनेक युनिट येथे तैनात करण्यात आले आहेत.