ऑनलाईन टीम / रायपूर :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. छत्तीसगडमध्ये तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे प्रदेश सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे आता छत्तीसगडची राजधानी रायपुरमध्ये 31 मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
या दरम्यान, रायपूर, दुर्ग, राजनांदगांव जिल्ह्यात अतिरिक्त सूट असणार आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने ऑड – इव्हन फॉर्म्युल्यानुसार चालू ठेवली जाणार आहेत.
या संबंधात सरकारने जिल्हाधिकारी, एस पी, आय जी आणि कमिशनर आदींना आदेश जारी केले आहेत. यामध्ये 15 मे नंतर राज्यात काय काय सुरू असेल आणि बंद असणार याबाबत माहिती दिली आहे. तसेच राज्यात दर रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
लॉकडाऊन दरम्यान या नियमांचे पालन करावे लागणार :
- रायपूरमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडे ई पास असणे आवश्यक आहे.
- कोरोनाची लस घेण्यासाठी ये – जा करण्यास नागरिकांना परवानगी असेल.
- आपतकालीन स्थितीत केवळ फोर व्हिलर, तसेच रिक्षेत ड्रायव्हर सह केवळ तीनच लोकांना प्रवासाची परवानगी असणार आहे.
- केवळ दूध, पेट्रोल आणि मेडिकल सेवा सुरू राहील.
- कारण नसताना वाहनाने फिरताना दिसल्यास 15 दिवसांसाठी वाहन जप्त केले जाईल.
- मीडिया कर्मचारी घरूनच काम करतील, आवश्यकतेनुसर ऑफिसला यावे लागल्यास सोबत आयडी कार्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- सर्व धार्मिक स्थळे बंद असणार.
- दुधाची दुकाने बंद ठेवली जातील. तर दूध वितरित करण्यासाठी सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 6.30 ही वेळ ठरवून देण्यात आली आहे.
- विवाह समारंभ आणि अंतिम विधीसाठी केवळ 10 च नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
- प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, हार्डवेअर, एसी, कुलर सारख्या स्थानिक व्यक्तिगत आणि बांधकाम संबंधित दुकाने आठवड्यात 6 दिवस सुरू असणार आहेत.