वृत्तसंस्था/मुंबई :
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी तेजी नोंदवल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा गुरुवारी चौथ्या सत्रात घसरणीची नोंद करत सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झाले आहेत. देशातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील चिंता आणखीन वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 242.37 अंकानी घसरुन निर्देशांक 31,443.38 वर बंद झाला आहे. तर एनएसई निफ्टी 71.85 अंकानी घसरुन निर्देशांक 9,199.05 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसईमधील एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि कोटक बँक यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या समभागांची घसरण झाली. तर अन्य कंपन्यांमधील ओएनजीसीचे समभाग 4 टक्क्मयांनी घसरणीसह बंद झ्घले अलाहेत. तर एनटीपीसी, कोटक बँक, टायटन, भारती एअरटेल आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभागांनीही घसरणीची कामगिरी नोंदवली आहे. समाधानकारक कामगिरी करणाऱयांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सहा टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. तर महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांच्या समभागात लाभ प्राप्ती झाली आहे.
मागील काही दिवसांपासून देशासह जगभरातील कोरोना रुग्णाचे आकडे भीतीदायक समोर येत आहेत. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आपला व्यवहार दबावाच्या वातावरणात करीत आहेत. देशातील कोरोना रुग्ण 50 हजारच्या वरती पोहोचले आहेत. त्यामुळे आगामी काळात आणखीन काय स्थिती होणार याबाबत नेंदवण्यात येणाऱया संकेतावरच गुंतवणुकीचा कल निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. जागतिक बाजारांमध्ये चीनचा शाघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिले आहेत. तर सुरुवातील युरोपीयन बाजार तेजीत होता. कोरोनावर लस लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास जगातील अर्थव्यवस्था रुळावर येण्यास खुप कालावधी लागणार असून त्यासाठी प्रत्येक देशाने आपली विशेष योजना आखण्याची गरज असून याच पातळीवर शेअर बाजाराचा कल राहणार असल्याचे जागतिक पातळीवरील अर्थतज्ञांनी म्हटले आहे.








