दोन शहरांमधून कोरोना महामारीच्या दरम्यान आशा वाढविणारी छायाचित्रे समोर आली आहेत. पहिले छायाचित्र जयपूरच्या एसएमएस रुग्णालयाच्या चरक भवनाचे आहे. तेथे कोविड ओपीडी आणि ओईपीडी केंद्र निर्माण करण्यात आले आहे. तेथे रुग्णांची तपासणी आणि देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग आहे.
चरक भवनात शिरणारा प्रत्येक कर्मचारी पायऱयांना स्पर्श करूनच प्रवेश करतो. हा आजार थांबावा, उपचार घेणाऱयांचे अहवाल निगेटिव्ह यावेत. संसर्ग झालेल्यांची प्रकृती ठिक व्हावी ही प्रार्थना करतच इमारतीत शिरत असल्याचे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे.
चेन्नईत टाळेबंदीच्या दरम्यान डॉक्टर कशाप्रकारे रुग्णांची काळजी घेत आहेत याचे उदाहरण दर्शविणारे छायाचित्र उपलब्ध झाले आहे. छायाचित्रात डॉ. जॉर्जी अब्राहम एका 75 वर्षीय रुग्णाला स्वतःच्या हातांनी घास भरवत असल्याचे दिसून येते. हा वृद्ध अत्यंत गरीब असून त्याने मासे-भात खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मासे-भात मागविले. नातेवाईक वॉर्डमध्ये येऊ शकत नसल्याने स्वतःच त्यांना अन्न भरविल्याचे अब्राहम यांनी सांगतले आहे.









