शिराळा / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल यावरच न थांबता समाजात पुढे यायला हवे. समाजकारण, व्यवसाय, उद्योग, अर्थकारण याबरोबरच राजकारणातही सहभाग घेतला पाहिजे. असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेमार्फत घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.