लोहखनिज, पोलादाची निर्यात अधिक : आयातीत झाली घट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2020-21 या चालू आर्थिक वर्षात भारताने चीनला पहिल्या पाच महिन्यांमध्ये दोन अंकी संख्येची निर्यात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात आयातीत मोठय़ा प्रमाणात घट करण्यात आली आहे. दोन्ही देशातला आयात व्यापार निम्मा कमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनमधून होणारी आयात बऱयाच प्रमाणात कमी करण्यात आली असल्याने याचे चांगले परिणाम दिसत आहेत. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला अनुसरून चीनवरील आयातीसंदर्भातले अवलंबत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या वषीच्या तुलनेत यंदा वषी एप्रिल आणि ऑगस्ट दरम्यान व्यापारी तूट भारताची 12 अब्ज डॉलर्सवर आली आहे. जी मागच्या वषी 22 अब्ज डॉलर्सची होती. ऑगस्टच्या सलग चौथ्या महिन्यामध्ये भारताची चीनला होणारी निर्यात दोन अंकी संख्येत झाली आहे. लोहखनिज आणि पोलाद यांची निर्यात चीनला करण्यात येत आहे. बिजिंगला होणारी निर्यातही 27 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे पहिल्या पाच महिन्यात आयात 27 टक्के इतकी कमी होऊन 21 अब्ज डॉलर्सवर आली आहे. ऑगस्टमध्ये चीनला होणारी निर्यात 15 टक्क्मयांनी वाढली आहे,.