ऑनलाईन टीम / टोकियो :
चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी उपकंपन्यांनी भारतात अथवा बांग्लादेशात स्थलांतर केल्यास जपानकडून त्यांना प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. नुकतीच जपानने यासंदर्भात घोषणा केली आहे.
चीनमधील जपानी कंपन्यांना त्यांच्या उपकंपन्या भारत अथवा बांग्लादेशात हलविण्याच्या सूचना जपानने केल्या आहेत. त्यांना प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात त्यासाठी 23.5 अब्ज येनची तरतूद करण्यात आली आहे.
जपानी कंपन्यांच्या पुरवठा साखळ्या चीनवर जास्त अवलंबून आहेत. जपानला हे अवलंबित्व कमी करायचे आहे. त्यामुळे जपानने उपकंपन्यांच्या स्थलांतरनास प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देण्याचे मान्य केले.









