प्रतिनिधी /बेळगाव
जखमी बगळय़ावर प्राथमिक उपचार करून त्याला जीवदान देण्याचे काम एका चिमुकलीने केले आहे. प्रताप गल्ली, येळ्ळूर येथील समीक्षा पाटील हिला आपल्या घरासमोर एक जखमी अवस्थेत बगळा सापडला. त्याच्या पंखांना इजा झाल्याचे दिसताच तिने व तिच्या कुटुंबाने त्या बगळय़ावर उपचार केले.
फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांना पाटील कुटुंबीयांनी बगळय़ावर पुढील उपचार करण्यासाठी संपर्क साधला. तातडीने संतोष दरेकर व त्यांचे सहकारी जॉर्ज रॉड्रीग्ज हे येळ्ळूर येथे पोहोचले त्यांनी तो बगळा घेऊन बेळगावच्या वन अधिकारी श्रीकांत देसाई यांच्याकडे दिला. सदर बगळय़ावर वन विभागाच्यावतीने उपचार करण्यात येत आहेत.









