चिपळूण
जून महिन्यात केवळ 18 दिवसांचा पगार मिळाला. उर्वरित बारा दिवसांचाही पगार मिळावा या मागणीसाठी चिपळूण आगारातील एस.टी. चालक सूर्यकांत माने यांनी सोमवारी उपोषण सुरु केले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी एस.टी. प्रशासनास दिले आहे.
माने हे आगारात चालक असून ते 57 वर्षांचे आहेत. उर्वरीत पगारासाठी माने यांनी एस.टी.च्या जिल्हा व तालुका प्रशासनासह मुख्यमंत्र्यांशीही पत्र्यव्यवहार केला आहे. मात्र न्याय न मिळाल्याने सोमवारी त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.









