ऑनलाईन टीम / मुंबई :
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. स्वतः हंसल मेहता यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत याबाबत सांगितले आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे.

हंसल मेहता यांनी लिहिले कि, मला नेहमी वाटायचे की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळ जगाल. पण, ती माझी चूक होती. मी तुम्हाला तिकडे भेटेन पप्पा. जगातील सर्वात देखणा माणूस. मला आजपर्यंत भेटलेला सर्वात शांत आणि दयाळू व्यक्ती. तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल तुमचे आभार. धन्यवाद लेजंड, माझा हिरो!
दरम्यान, बॉलीवुड कलाकार फरहान अख्तर, पूजा भट, विशाल दडलानी, रिमा कागती, अतुल कसबेकर आदींनी सोशल मीडियाद्वारे दीपक मेहता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काही दिवसांपूर्वी हंसल मेहता यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. हंसल मेहता एक यशस्वी निर्माता असून त्यांना ‘शहीद’ या फिल्मसाठी बेस्ट डायरेक्टसाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील मिळाले आहे. तर गेल्या वर्षी आलेली हर्षद मेहता घोटाळा या प्रकरणावर बेतलेली ‘स्कॅम 1992’ ही वेब सिरीज प्रचंड गाजली होती.









