क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
कोरोना प्रादुर्भावामुळे अनिश्चिततेच्या सावटात असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बांधण्यात येणाऱया चिखली क्रीडा संकुलातील स्क्वॉश कोर्टचं काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. स्क्वॉश कोर्टच्या छताचे काम आता पूर्ण झाले असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाईंनी दिली.
गोव्यात येत्या ऑक्टोबर आणि मे महिन्यात 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ही स्पर्धा नियोजित वेळेत होणार का पुढे जाणार याबद्दल मात्र अनिश्चितता आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे जाणार हे सध्या निश्चित आहे. शासनाने मात्र निर्धारीत वेळेत सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. मात्र सध्या कुशल आणि अकुशल कामगार उपलब्ध होत नसल्याने निर्धारीत वेळेत कामे पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.









