सांगली / प्रतिनिधी
थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. वाढत्या थंडीत चिक्की रेवडी खाण्याची मजा काही औरच आहे. हे पदार्थ अंगामध्ये उष्णता निर्माण करणारे असल्याने, त्यांना या दिवसात अधिक मागणी असते. सांगलीतील सुप्रसिद्ध जाधव बंधू यांचे चिक्की, रेवडी, राजगिरा वडी, लाडू आदी खाद्यपदाथांना चांगलीच प्रसिद्धी आहे.
त्यामुळे शहरात अनेक दुकानातून जाधव बंधूंची ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर दिसतात.
अनेक खाद्यपदार्थाच्या गाडीवर या पदार्थां ना चांगली मागणी असते. या दिवसात चिक्की-गुडदाणी यांच्यासोबत आता बटाटा- वेफर्स, केळीचे वेफर्स, चिलीमिली, फरसाणा , बिस्कीटे आदींचीही रेलचेल असते. दिवाळीनंतर विक्री मध्ये मोठी वाढ होते. तसे हे पदार्थ बाराही महिने खाल्ले जातात, त्यामुळे या स्टॉलवर चिक्की-रेवडी यांना बारमाही मागणी आहे.








