मोबाईल, लॅपटॉपसह सहा संशयितांना अटक : भाड्याच्या खोलीत सुऊ होते कॉल सेंटर
प्रतिनिधी / पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) चिंबल येथे केलेल्या कारवाईत बनावट कॉल सेंटर चालवून सर्वसामान्य लोकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सहा संशयितांना अटक केली आहे, त्यांच्याडून सहा लॅपटॉप व मोबाईल मिळून सुमारे 10 लाख ऊपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये अंकुश हितेशभाई पांचोली (28), थ्रेमोह केंचिंगबा (23), सनम रिंगसा भाथारी (23), आनंद सुजीत सेंगयुंग (26), लैरीम मोनमोहन होजाय (19), हेमरींग सोनाय गिरीसा (22) यांचा समावेश आहे. सर्व संशयित नागालँड येथील आहेत.
संशयितांनी चिंबल येथे एका भाड्याच्या खोलीत काल सेंटर सुऊ केले होते. या सेंटरमधून कर्ज मिळवून देणे, वैद्यकीय बिलांची रक्कम समंत करून देणे इत्यादी प्रकारची कामे करणार असल्याचे मेसेज मोबाईलवर पाठवले जायचे. त्यांच्याशी संपर्क करणाऱ्याला लाखो ऊपयांचा गंडा घालीत होते. सीआयडी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करून संशयितांना अटक केली.
सीआयडी उपअधीक्षक सुरज हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विश्वजित चोडणकर, हवालदार संजय पेडणेकर, सर्वेश खांडोळकर, इश्वर कासकर, अशोक गावडे, महिला हवालदार स्नेहा जावीर, यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुऊ आहे.








