ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येने तर उच्चांकी संख्या गाठली आहे. मागील 24 तासात प्रदेशात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 6,692 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी शुक्रवारी पहिल्यांदाच सप्टेंबर मधील सर्वाधिक 6000 रुग्ण आढळून आले होते.
याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी शनिवारी सांगितले की, मागील 24 तासात 6692 रुग्णांची नोंद झाल्याने प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 59 हजार 765 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 95 हजार 959 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रदेशात रुग्ण होण्याचे प्रमाण 75.43 % इतके आहे. तर आतापर्यंत 3843 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.47% आहे.
पुढे ते म्हणाले, सध्या प्रदेशात 59,963 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 30,848 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. पुढे ते म्हणाले, 50 टक्के पेक्षा अधिक रुग्ण सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.
प्रदेशातील चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून शुक्रवारी एका दिवसात 1 लाख 48 हजार 274 कोरोना नमुन्याची चाचणी करण्यात आली. तर आत्तापर्यंत 63 लाख 45 हजार 223 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.