प्रतिनिधी /काणकोण
काणकोण नगरपालिका क्षेत्रातील चावडीवर भर बाजारात पाणी पुरवठा खात्याने मारलेला खड्डा सद्या धोकादायक बनलेला असून सतत पडणाऱया पावसामुळे या खड्डयात पाणी भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मडगाव कारवार मार्गावरील चावडीवरील मोटार सायकल आणि रिक्षा स्टँडच्या समोर नवीन जलवाहिनी साठी हा खड्डा मारण्यात आलेला आहे. सतत रहदारीचा असा हा मार्ग असून चावडीवरील मासळी, भाजी मार्केट त्याच प्रमाणे काणकोण पालिका इमारतीकडे जाणाऱया रस्त्याच्या वळणावरच हा खड्डा असून वीज पुरवठा खंडीत झाल्यास या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता व्यकत करण्यात येत आहे. मागच्या आठ दिवसांपासून हा खड्डा तसाच असून या मार्गावरून येणाऱया आणि जाणाऱयांचा हा सद्या चर्चेचा विषय बनला आहे.









