नितीन निंबाळकर यांची उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी / बेळगाव
इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून राहुल अडके यांची तर उपाध्यक्षपदी नितीन निंबाळकर यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून मडिवाळअप्पा तिगडी, खजिनदार म्हणून सतीश मेहता यांची निवड झाली. तर जयकुमार पाटील यांची एसआयसीएएसएचे चेअरमन म्हणून निवड झाली.
संस्थेच्या स्वरुप प्लाझा येथील कार्यालयात एका छोटेखानी समारंभात राहुल अडके यांनी मावळते चेअरमन सतीश मेहता यांच्या हस्ते सूत्रे स्वीकारली.









