ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. आज या खटल्यातील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने यात्रेला स्थगिती देण्याचा २८ जूनचा निर्णय मागे घेतला. कोविडच्या नियमांचे पालन करून चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने महाधिवक्ता म्हणाले की, राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत प्रवासावरील बंदी उठवावी. सरकार यात्रेसाठी नवीन एसओपी जारी करेल. केदारनाथ धाममध्ये ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यामुनोत्रीमध्ये ४०० प्रवाशांना दररोज प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, प्रवाशांना कोणत्याही हौदात आंघोळ करता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.