बेळगाव
श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती देऊन जिल्हा रूग्णालयात दाखल होण्यास गेलेल्या व्यक्तीला कुमार गंधर्व सभाग्रहात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी दाखल होऊन त्रास होत असल्याची माहिती दिल्यानंतर चाचपणी केली असता सदर व्यक्ती मध्ये कोरोना ची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची बॉम्बे उडाली. अखेर जिल्हा रुग्णालयात याबाबत माहिती देऊन त्या ठिकाणी पाठविण्यात आले.
अथणी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याने जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. मात्र प्राथमिक संपर्कात असलेल्या नागरिकांची तपासणी करून क्वारटाईन करण्यात आले नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या च्या मुलाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सदर मुलगा स्वतःच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. पण त्याला कुमार गंधर्व सभाग्रहाकडे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी त्या व्यक्तीची माहिती घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता साप आणि सर्दी असल्याचे आढळून आले. आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती त्या ठिकाणी दिली. त्यामुळे कुमार गंधर्व सभाग्रहात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची भबेरी उडाली. आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. तातडीने खबरदारी घेऊन त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी बसविण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयात ची माहिती देऊन त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पण सदर व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी कुमार गंधर्व सभागृहात पाठविण्यात आले. श्वसनाचा त्रास वाढू लागल्याने स्वतःच्या कारने जाण्याऐवजी रिक्षाने कुमार गंधर्व सभाग्रहा कडे आला. पण चाचणी केला असता ताप असल्याचे आढळून आल्याने रिक्षा चालकासह संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरु झाली. अखेर राणी चन्नम्मा चौकातील रिक्षा स्थानकावर संपर्क साधून रिक्षा चालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले. पण जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणामुळे सर्वच गोत्यात आले.
Previous Articleझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ‘होम क्वारंटाइन’
Next Article हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाचे नवे नियम