इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजीलगतच्या एका गावामध्ये सात वर्षीय बालिकेवर एका युवकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कोल्हापूर येथील चाईल्डलाईन हेल्पलाईनने उघडकीस आणला . भाउसो शितगोडा पाटील ( वय ४५ , रा . जैनापुर , ता . शिरोळ ) असे संशयित आरोपीचे नाव आहे . त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक त्वरीत रवाना झाले आहे . तर याबाबतचा गुन्हा नोंद करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिसात सुरु होते.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, संशयित आरोपी भाऊसो पाटील कामानिमित्ताने शहरालगतच्या गावातील नातेवाईकांकडे २७ जानेवारी रोजी दुपारी आला होता . यावेळी नातेवाईक घरी नसल्याचे पाहून त्याने नातेवाईकाच्या घराशेजारी खेळत असलेल्या पिडीत बालिकेला गोड बोलून घरात बोलावून घेतले . त्याने पिडीतेवर लैंगिक अत्याच्यार केला . हा प्रकार एका संशयित आरोपीच्या नात्यातील एका वृध्देने पाहिला . तिने याबाबतची माहिती पिडीत बालिकेच्या कुटुंबीयांना दिली . त्यानंतर संशयित आरोपीचे नातेवाईक आणि पिडीतेच्या कुटुंबीयांमध्ये बैठक झाली . यामध्ये मध्यस्ती करणाऱ्यांनी संशयिताला बेदम मारहाण करून, त्याच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माफी मागण्यास भाग पाडूनपडदा टाकला . तरी देखील या घडल्या प्रकाराची त्या गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
या प्रकरणाची अज्ञाताने कोल्हापूर येथील चाईल्डलाईन संस्थेच्या हेल्पलाईनवर शुक्रवारी सकाळी संपर्क साधला. या प्रकाराची सविस्तर माहिती चाईल्डलाईन पदाधिकाऱ्याना दिला. त्यावरून चाईल्डलाईनचे स्वयंसेविका तेजस्विनी मदने , सदस्य ओकार कुर्ले , जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य महेश कांबळे आदींचे पथक त्या गावांत दाखल झाले . या पथकाने पिडित बालिकेचा नातेवाईकांची भेट घेतली. घडल्या प्रकाराची खातरजमा केली . याच दरम्यान या पथकाला मध्यस्ती करवाऱ्या व्यक्तिनी पिडित बालिकेसह तिच्या आईला बाहेरगावी पाठवून दिल्याचे उघडकीस आले . त्यानंतर पथकाने पिडित बालिकेसह तिच्या आईचा शोध घेवून त्याच्याकडून घडल्या प्रकाराची माहिती घेतली . त्यानंतर पिडितेसह तिच्या आईला घेवून चाईल्डलाईनच्या पदाधिकाऱ्यानी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली . त्यांना झाल्या घटनेची माहिती दिली . त्यावरून अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. संशयित आरोपी भाऊसो पाटील याच्या शोधासाठी एक पथक त्वरित रवाना केले . रात्री उशिरा याबाबत शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









