प्रतिनिधी /शिराळा
नंदकुमार नलवडे यांची चांदोली वन्यजीवचे नवे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून नियुक्ती झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगुटे यांची बदली झाल्याने त्यांची जागी नलवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चांदोली ता. शिराळा येथील वनभवनामध्ये गोविंद लंगुटे यांना निरोप देण्यात आला. तर नंदकुमार नलवडे यांनी पदभार स्विकारला. यावेळी मावळते वनपरिक्षेत्राधिकारी लंगुटे यांचा निरोप समारंभ तर नूतन वनपरिक्षेत्राधिकारी नलवडे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना नलवडे म्हणाले, चांदोली अभयारण्यात पर्यटन वाढ आणि जैव विविधता संवर्धनाच्या दृष्टीने प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Previous Article…म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय! : राज ठाकरे
Next Article लष्कराचा ‘तो’ जवान 18 दिवसांपासून बेपत्ता








