रस्त्याच्या विकासामुळे वाहतुकीचा ताण इतरत्र मार्गावर, शहरात वाहतूक कोंडी जटिल
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील वाहतुक कोंडीचा भार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच सध्या शहरातील रस्त्याच्या विकास कामामुळे आणखीच भर पडत आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने शहरांतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाढती वाहने, अरूंद रस्ते, रस्त्यांची खोदाई यामुळे वाहतूक कोंडी जटिल झाली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचा विकास साधला जात आहे. त्य़ामुळे काही रस्ते बंद आहेत. तर काही रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे इतरत्र रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. कोल्हापूर सर्कलपासून चन्नम्माकडे येणारा मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शिवाय वाहतुकीचा ताण चव्हाट गल्लीत वाढून चव्हाट गल्लीत वाहतूक कोंडी झाली