प्रतिनिधी / बेळगाव
संकल्प लेआऊट, केएचबी कॉलनी, हिंडलगा येथील चिमुकल्याने अप्रतिम अशी तोरणागडाची प्रतिकृती तयार केली आहे. कियान रोहन नाकाडी असे त्याचे नाव असून वडिलांच्या मदतीने त्याने आपली आवड जोपासली आहे.
एलकेजीमध्ये शिकणाऱया कियानने 5 दिवसांमध्ये आपल्या घराच्या अंगणात हा किल्ला साकारला आहे. वडील रोहन यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तसेच इंटरनेटवरून माहिती जमा करून त्याने हा किल्ला साकारला आहे. यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील बालचमूंची गर्दी होत आहे.









